संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 साली पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी 9 वर्षे राज्य केले. मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज यांसारख्या अन्य शासकांविरुद्ध लढा देत त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले.